नाशिक (प्रतिनिधी) :- अश्लील फोटोंच्या आधारे बदनामी करण्याच्या धमकीला कंटाळून मायलेकीने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की फिर्यादी यांची पत्नी व आरोपी इसम यांचे अनैतिक संबंध होते. या आरोपी इसमाकडे फिर्यादीच्या पत्नीचे काही अश्लील फोटो होते. त्या फोटोचा वापर करून या इसमाने फिर्यादीच्या मुलीसोबत संबंध बनविण्यासाठी प्रयत्न केला. या आरोपी फिर्यादीची पत्नी व तिच्या मुलीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

आरोपी इसमाच्या या त्रासाला कंटाळून या मायलेकीने दि. 29 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही बाब विवाहितेच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर पत्नी व मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या इसमाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.