नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवार (दि. २१) रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते उदघाटने व भाजप कार्यकर्ता मेळावा होणार असल्याचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी सांगितले आहे.
प्रभाग क्रमांक २७ मध्ये पाथर्डी फाटा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील गंगापूर-सावरगाव रोड वरील प्रसिध्द मराठी नाटककार प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या नावाने विकसित केलेल्या उद्यानाचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल.
भाजप नाशिक महानगराचा कार्यकर्ता मेळावा होईल. सदर मेळाव्यास देवेंद्र फडणवीस संबोधित करतील. वरील सर्व कार्यक्रमांना नाशिक भाजप अध्यक्ष गिरीष पालवे, केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार, भाजप प्रदेश सरचिटणीस प्रा.आ.देवयानीताई फरांदे, नाशिक प्रभारी आ. जयकुमार रावल, महापौर सतिश कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, मनपा सभापती गणेश गिते, मनपा सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, सर्व नगरसेवक आदींसह सर्व बुथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर, सुनील केदार, जगन अण्णा पाटील यांनी पत्रकान्वये केले आहे.