नाशिक (प्रतिनिधी) :– पुढच्या पाच वर्षात लोकांचा आशीर्वाद मिळाला तर निर्मल नाशिक करायचे आहे. अवघे नाशिक प्रदूषण मुक्त करण्याचे नियोजन असून, त्यासाठी “नमामि गोदा” लवकरच सुरू होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आम्हाला राज्य हवे असते ते विकास करण्यासाठी, बदल करण्यासाठी असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्ता मेळाव्यासाठी फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते. मनोहर गार्डन येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पार्टी जो निर्णय घेईल त्याच्यामागे सर्वांनी उभे रहायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे सांगताना नाशिकची पॉलिटिकल केमिस्ट्री भाजपबरोबर आहे. त्यामुळे महापालिकेवर भाजपाचाच पुन्हा भगवा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आता भगव्याची जबाबदारी भाजपने घेतली असल्याचे सांगत शिवसेनेला जोरदार टोलाही हाणला.