नवी दिल्ली : डीजीएसएने ६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या घटनेची तक्रार न केल्याबद्दल एअर इंडियाला १० लाखांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीने सांगितले की, एअर इंडियाला जेव्हा या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा आम्हाला सांगितले नव्हते.
दरम्यान, एअर इंडियाचे AI 142 पॅरिस ते दिल्ली या फ्लाइट मध्ये हा प्रकार घडला होता. यामध्ये एका पुरुष प्रवाशाने वॉशरूममध्ये सिगारेट ओढली आणि नंतर सीटवर झोपलेल्या एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती.

या आधी नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
https://twitter.com/ANI/status/1617821734929063939?s=20&t=WXQ0dUB4enwg_xt50AOvrA