नाशिक (प्रतिनिधी)- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन पत्र वाटप व स्वीकृती प्रक्रिया, आज ३० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३.०० पर्यंत पार पडली.

उद्या ३१ मार्च रोजी दुपारी ४.३० ते ५.३० पर्यंत नामांकन अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान चेअरमन धनपाल शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांचे या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.त्याच त्याचबरोबर जॉईंट सेक्रेटरी आणि निवड समिती सदस्य पदासाठी तीन पदांसाठी तीन अर्ज आल्याने यांची निवड आता बिनविरोध झाली आहे. निवडणूक झाल्यास केवळ सदस्य पदासाठी होण्याची शक्यता आहे ,मात्र या पदासाठी 17 अर्ज आल्याने उद्या माघारीच्या दिवशी किती जण माघार घेतात त्यावर सदस्य पदासाठी मतदान होईल की नाही हे ठरणार आहे. दरम्यान 2003 पासून धनपाल शहा आणि समीर रकटे यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनवरील पकड या निवडणुकीतही कायम ठेवली.
नामांकन दाखल झालेले पद व नावे पुढीलप्रमाणे :
चेअरमन : १) धनपाल (विनोद) शाह.
सेक्रेटरी : १) समीर रकटे.
खजिनदार : १) हेमंत देशपांडे.
जॉइंट सेक्रेटरी : १) योगेश ( मुन्ना ) हिरे २) चंद्रशेखर दंदणे.
निवड समिति सदस्य : १) सतीश गायकवाड.२) तरुण गुप्ता ३)फय्याज गंजीफ्रॉकवाला.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद एकूण २७६० असून ६२ क्लब सभासद आहेत. दहा कार्यकारिणी सभासद पदांसाठी मात्र पुढीलपप्रमाणे एकूण सतरा जणांनी नामांकन पत्र भरले आहे .
१-महेश मधुकर मालवी . २-हेतल खेमचंदभाई पटेल . ३-राघवेंद्र जयंतकुमार जोशी ४-विलास विश्वनाथ झेंडफळे. ५-मेहेन्द्र कारभारी आहेर .६-शिवाजी भीमाजी उगले . ७-रुफ मोहम्मद पटेल . ८-अनिरुद्ध विनायक भांडारकर . ९-निखिल रामनारायण टिपरी . १०-जगन्नाथ चंदु पिंपळे.
११-विनायक परशुराम ( पुरुषोत्तम ) रानडे .१२-संजय परीक्षित परिडा .
१३-बाळासाहेब उमाजी मंडलिक १४-महेश देवबा भामरे .१५- नीलेश दिलीपराव चव्हाण .१६-गणेश शिवाजीराव कुशारे . १७-योगेश कमोद .