मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृती खालावली असल्याच्या नव्या बातमीने आज सकाळपासून कहर माजवला आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर नसून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दखल केलं आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती असं सांगितलं जात आहे. त्यांना एप्रिल महिन्यात देखील पाठीच्या दुखापतीमुळे तात्काळ आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. सकाळपासूनच त्यांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत होती. यावर त्यांचा मुलगा बॉबी देओलने वर्क अत्यंत महत्त्वाचा अपडेट दिला आहे.

धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने धर्मेंद्र आजारी असल्याच्या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. बॉबीने धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल पसरलेल्या अफवांना पूर्णविराम देत हे सांगितलं की त्याच्या वडिलांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्यांना काही झालेलं नाही. इंडिया टुडे शी बोलताना बॉबीने हे स्पष्ट केले की धर्मेंद्र यांची प्रकृती उत्तम आहे. तो असे म्हटला की, माझ्या वडिलांची अर्थात धर्मेंद्र जी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या तब्येतीला काही झालं नाही. ते घरी आहेत, आराम करत आहेत आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील अशा खात्रीशीर शब्दात बॉबीने सारं काही आलबेल असल्याचं सांगितले आहे.