नाशिक (प्रतिनिधी) :- दैनिक भ्रमरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय भव्य वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सर्वांना मोफत प्रवेश असून, स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

- स्पर्धेसाठी विषय
- भारत@75 : एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे
- डिजिटल युगात आपण ई-मजूर तयार करीत आहोत?
- प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शिल्लक आहे?
- नवीन शैक्षणिक धोरण-2020 : गुणवत्तेचा संकोच?
- महामारीसाठी भारत समर्थ आहे?
ही स्पर्धा सिटी सेंटर मॉलने प्रायोजित केली असून, सहभागासाठी विद्यार्थ्यांनी दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त युवकांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी नियम
- प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी आठ मिनिटांचा वेळ असेल.
- ही स्पर्धा मराठी माध्यमात होणार असून, अंतिम फेरीसाठी प्रत्येक महाविद्यालयाने दोन विद्यार्थ्यांचा एक संघ पाठवायचा आहे.
- स्पर्धक हा त्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी असावा. त्याच दृष्टीने स्पर्धकाकडे महाविद्यालयाचे पत्र व स्वतंत्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त वयाची कोणतीही अट नाही.
- स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पाच मिनिटांसाठी उत्स्फूर्त स्पर्धा घेतली जाईल.
अशी आहेत बक्षिसे
- प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये व प्रमाणपत्र
- द्वितीय सात हजार रुपये व प्रमाणपत्र
- तृतीय पाच हजार रुपये व प्रमाणपत्र
- उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी एक हजार रुपये.
- उत्कृष्ट संघास भ्रमर करंडक
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ. राकेश पाटील (8275519056), डॉ. प्रकाश शेवाळे (8975555815) व हितेश शाह (9922111232) यांच्याशी संपर्क साधावा.