इंदिरानगर (प्रतिनिधी) :- गौळाणे येथील मळ्यातील बंगल्यात प्रवेश करून बिबट्याने रात्रीच्या वेळेस कुत्र्यावर हल्ला करीत त्यास जखमी केले.
गौळाणे येथील शांताराम पांडुरंग चुंबळे यांच्या मळ्यातील बंगल्याच्या परिसरात बिबट्याने प्रवेश करीत चुंबळे यांच्या कुत्र्यावर हल्ला करीत त्यास जखमी केले.
सीसीटिव्ही फुटजेमध्ये सुरूवातीला कुत्र्याने पळ काढला. परंतु तो बिबट्याच्या तावडीत सापडला. पिंपळगाव खांब, पाथर्डी व गौळाणे परिसरात अनेकदा बिबट्यांचा वावर असतो. उसाच्या मळ्यामध्ये बछाड्यांसह बिबट्यांचे अनेकदा वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा