ज्या घरी लग्न सोहळा असतो तेव्हा हा लग्न सोहळा अपूर्व उत्साहात साजरा होत असतो. लग्नाची घाई गडबड ,घरात आप्त साकीयांचा वावर लग्नाच्या विविध प्रथेप्रमाणे सर्व गोष्टींची तयारी ही होत असते आणि त्याचाच भाग म्हणून पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम असतो.

अशाच एका आपल्या जवळचे चांदवड तालुक्यातील देनेवाडी गावचे कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी शिवाजी मोरे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावता येणार नव्हती म्हणून ना डॉ. भारती पवार यांनी लग्नघरी जाऊन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी योगायोगाने पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता त्याठिकाणी मंत्रीमहोदया आपला कुठलाही बडेजाव न दाखवता पुऱ्या लाटण्यासाठी बसल्या .मग सर्वांच्या उत्साहाला उधानच आले लग्नाची गाणी सुरू झाली.

नवरी येऊन बसली सर्वच पुऱ्या लाटण्यात मग्न झाले आपल्या मुलीच्या लग्नात स्वतः आपल्या नामदार ताई आठवणीने आल्या आणि घरच्या महिलांसोबत कार्यक्रमात सहभागी झाल्या हे बघून नवऱ्या मुलीच्या बापाचा उर आनंदाने भरूनआला .ना. डॉ. भारती पवार एवढ्या मोठ्या पदावर जाउन सुद्धा कुठलाही गर्व बडेजाव न मिरवता आपले पाय जमिनीवरच असल्याचे ह्या प्रसंगातून दाखवून दिले. ताईंच्या पुऱ्या लाटण्याची चर्चा तालुक्यात नव्हे तर सर्वदूर पसरली.व अनेकांनी ताईंच्या ह्या कृतीचे कौतुक केले.
Video : https://youtu.be/vcr0MAHXcRo