नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अवघ्या चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त रमेश पवार यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली. या पदावर डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला.

आयुक्तपदी असलेल्या रमेश पवार यांना बदले झाल्याचे समजल्यानंतर ते कालच मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने आयुक्तपदी नियुक्त झालेल्या पुलकूंडवार यांनी आज पदभार स्वीकारला.

यावेळी उपायुक्त मनोज घोडे पाटील व उपायुक्त सुरेश खाडे उपस्थित होते. आयुक्त दलनात येऊन त्यांनी हा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच सर्व विभाग प्रमुख यांचे बैठक घेतली.