डॉ. पार्थ देवगांवकर ठरले देवदूत; विना डायलिसीस रुग्णाला केले बरे

नाशिक (प्रतिनिधी) :- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावात नागरीकांकडून अनेक प्रकारची वेदनाशामक औषधे घेतली जात असतात. परंतु या औषधांचा परिणाम हा थेट किडनीवर होत असून त्याचा भविष्यात त्रास होवू शकतो. अशाच प्रकारे एका रुग्णावर डायलिसीसची परिस्थिती आलेली असतांनाही डॉ. देवगांवकर हॉस्पिटलमध्ये डॉ. पार्थ देवगांवकर यांनी या रुग्णावर डायलिसीस न करता उपचार करून त्यांना बरे केले आहे.

डॉ. देवगांवकर हॉस्पीटलमध्ये भरती झालेल्या एका रुग्णाचा क्रियाटिनीन हा घटक 14 पर्यंत गेल्याने अत्यंत नाजूक, गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या रुग्णास डायलिसिस सारखी नेहमीची उपचार पध्दती की जी रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत कंटाळवाणी व महागडी ठरू शकते. डायलिसीस न करता आपत्कालीन औषधोपचाराची निवड करून या दुर्धर आजारातून रुग्णाची सुटका करण्याची किमया डॉ. पार्थ नारायण देवगांवकर यांनी केली आहे. सदर रुग्ण काही दिवसांपूर्वी डॉ. देवगांवकर हॉस्पीटलमध्ये आला. तेव्हा क्रियाटोनीन हा घटक 14 पर्यंत वाढलेला होता. तो सामान्यपणे 1.4 पर्यंत हवा. या घटकाची एवढी वाढ म्हणजे किडनीस धोका उत्पन्न झाल्याचे लक्षण असते. तसेच रुग्णास चक्कर येवून त्याचा रक्तदाबही खूपच कमी झाला होता. एकंदरीत रुग्ण गंभीर अवस्थेत होता.

सुदैवाने डॉ. देवगांवकर हॉस्पिटलमध्ये नव्याने रुजू झालेले किडनी विकार तज्ञ डॉ. पार्थ देवगांवकर यांचे उपचार रुग्णास मिळाले. डॉ. पार्थ हे एम.डी. (मेडिसीन) डी.एन.बी., इ.एस.ई (नेफ्रोलॉजी) असे उच्चविद्याविभूषीत आहेत. मुंबईतील सुप्रसिध्द हिंदुजा आणि सायन रुग्णालयामध्ये त्यांनी कामाचा अनुभव घेतलेला असल्याने या आपल्या ज्ञानाचा आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी या रुग्णाचा जीव वाचवला आहे.सध्या किडनी संदर्भात विकारांची संख्या खूपच वाढत असून अनेकांच्या जीवावर हा आजार आला आहे. अनेकजण काही त्रास झाला की वेदनाशामक औषधे घेतात आणि किडनीला त्रास करून घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतेही औषध घेतांना वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे असे डॉ. देवगावकर यांनी सांगितले.

धकाधकीच्या जीवनात नागरिकांकडून वेदनाशामक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु कोणतेही औषध घेतांना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. किडनीवर त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर चेहरा, पायांवर सूज, लघवी कमी किंवा जास्त होणे अशी काही लक्षणे दिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे आजार अंगावर काढू नये याचा आपल्या जीवाला त्रास होवू शकतो.

– डॉ. पार्थ देवगांवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!