नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह परिसरामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये अद्यापपर्यंत किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली आहे याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि. २४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाचे हे धक्के उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये देखील अनेक ठिकाणी जाणवले आहेत. उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथे देखील भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी मोजली गेली आहे. नेपाळमधील कालिका येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर आत होता. ५.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे धक्के नेपाळशिवाय भारतामधील अनेक शहरांमध्ये सुमारे ३० सेकंद जाणवले आहेत. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
उत्तराखंडमधील जोशीमठलादेखील या भूकंपाचा फटका बसू शकतो. याची पुष्टी झाली नसली तरी भूकंपाचा केंद्रबिंदू जोशीमठपासून अवघ्या २४० किमी अंतरावर होता आणि त्याची तीव्रताही खूप जास्त होती. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून ३०० किमी अंतरावर होता.
https://twitter.com/ANI/status/1617809721142173696?s=20&t=U_iQA-Jv9fSSc0GTiG0x_A