नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. आज संजय राऊतांना पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. राऊतांच्या घरी काही कागदपत्र आणि बेनामी संपत्ती सापडली आहे. त्यामुळे ईडी 10 दिवसांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. राऊत यांना अटक केल्यानंतर ईडी कोर्टामध्ये काय मागणी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती. या कारवाई दरम्यान ईडीला काही मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. ही मालमत्ता पूर्वी ईडीच्या माहितीत नव्हती.

मालमत्ता बेनामी आहेत की नाही हे तपासण्याचा ईडी प्रयत्न करत आहे? अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईडीच्या वतीने पीएमएलए कोर्टात 10 दिवसाची कोठडी मागण्याची शक्यता आहे. ंजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणे ं टाळले होते. अखेर ईडी अधिकार्यांनी रविवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर छापा टाकला आणि रात्री कार्यालयाला नेऊन अटक केली