नाशिक (प्रतिनिधी) :- शहर परिसरात एका स्कॉर्पिओसह सुमारे आठ लाख रुपये किमतीची वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.

स्कॉर्पिओ चोरीची घटना पाथर्डी फाटा येथे घडली. फिर्यादी सुनील मधुकर शिंदे (वय 40, रा. गायत्री निवास, अयोध्या कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी एमएच 15 ईपी 7452 या क्रमांकाची 7 लाख रुपये किमतीची पांढर्या रंगाचे महिंद्रा स्कॉर्पिओ हे वाहन घराच्या पार्किंगमध्ये पार्क केले होते. ही स्कॉर्पिओ दिनांक 18 ते 19 जुलैदरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. स्कॉर्पिओची चोरी झाल्याची बाब दुसर्या दिवशी सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला तपास केला; मात्र गाडी मिळून आली नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओचोरीची फिर्याद नोंदविण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

मोटारसायकलचोरीची पहिली घटना नाशिकरोड येथे घडली. फिर्यादी आसिफ शब्बीर शेख (वय 53, रा. मनीषा अपार्टमेंट, दुर्गा गार्डनसमोर, नाशिक) यांनी एमएच 15 एफएक्स या क्रमांकाची 35 हजार रुपयांची होंडा कंपनीची डीओ मोेपेड ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दि. 20 ते 21 जुलैदरम्यान मध्यरात्री कधी तरी चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेख यांनी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
मोटारसायकलचोरीची दुसरी घटना आनंदनगर येथे घडली. फिर्यादी विनोद भीमसिंग जांभोरे (वय 46, रा. गृहशोभा सोसायटी, आनंदनगर, नाशिक) यांनी एमएच 15 एई 8639 या क्रमांकाची दहा हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची मोटारसायकल राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास जांभोरे यांनी नजर चुकवून चोरून नेली. ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार माळोदे करीत आहेत.
मोटारसायकलचोरीची तिसरी घटना मार्केट यार्डमध्ये घडली. फिर्यादी विशाल राजेंद्र केदार (वय 25, रा. उमराळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे दि. 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मार्केट यार्ड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी यार्डातील पोलीस चौकीसमोर एमएच 15 डीडब्ल्यू 5372 या क्रमांकाची 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक गुंबाडे करीत आहेत.
मोटारसायकलचोरीचा चौथा प्रकार पाथर्डी रोड येथे घडला. फिर्यादी चुडामण लक्ष्मण पाटील (वय 39, रा. श्रीपाद रेसिडेन्सी, वडाळा-पाथर्डी रोड) यांनी एमएच 15 एपी 4472 या क्रमांकाची 20 हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल घरामध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल मध्यरात्रीच्या सुमारास कधी तरी चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळदे करीत आहेत.
सायकलचोरीचा प्रकार महालक्ष्मीनगर येथे घडला. फिर्यादी रोहन केशवलाल पटेल (वय 37, रा. आशीर्वाद सदन, महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, नाशिक) यांनी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये हिरो कंपनीची पाच हजार रुपये किमतीची लाल व काळ्या रंगाची सायकल पार्क केली होती. ही सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक नाईक करीत आहेत.