महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी शपथ घेणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला त्यानंतर आज सायंकाळी एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवे मुख्यमंत्री असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र त्याला आज युटर्न मिळाला असून, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार असल्याची घोषणा आज खुद्द माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ेवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान आज संध्याकाळी दोन्ही नेत्यांचा शपथविधी होणार आहे.

50 आमदार एकाच वेळी विरोध करतात, ग्रामपंचायत सदस्यही विरोध करतात म्हणजेच शिवसेनेचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे, एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!