मुंबई : एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवल्यानंतर आज शिवसेनेकडून आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1539548584995332096?t=NRtoQbUP8umcZdnvGfQPCQ&s=19
या ट्वीटमध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.