शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत मुख्यमंत्रीपदाचा तसेच पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे,”.