राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

 

मुंबई : राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने या निवडणूका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसामुळे ८९ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहे. राज्यात अतिवृष्टी असल्याने २४९ गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!