
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्ष धनपाल (विनोद) शाह, सेक्रेटरी समीर रकटे
तसेच खजिनदार, जॉइंट सेक्रेटरी व निवड समिति सदस्यही बिनविरोध असले तरी कार्यकारिणी सदस्यपदाच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारी अर्ज आल्याने आता 9 एप्रिल मतदान घेणे अटळ झाले आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी च्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन अर्जाची माघारी प्रक्रिया, आज (दि.१) दुपारी ४.३० पर्यंत पार पडली. त्यानुसार पाच पदाधिकारी व तीन निवड समिति सदस्य पदाकरिता, एकूण 8 पदाधिकारी बिनविरोध निवडून आले त्यामध्ये
अध्यक्ष : धनपाल शाह, सेक्रेटरी : समीर रकटे, खजिनदार : हेमंत देशपांडे, जॉइंट सेक्रेटरी : योगेश हिरे, चंद्रशेखर दंदणे, निवड समिती सदस्य : सतीश गायकवाड, तरुण गुप्ता, फय्याज गंजीफ्रॉकवाला यांचा समावेश आहे.
मात्र कार्यकारिणी सदस्यांच्या १० पदांसाठी, माघारी नंतर पुढील प्रमाणे ११ अर्ज राहिल्याने दि. ९ एप्रिल रोजी अन्नपूर्णा सभागृह, मते नर्सरी, गांगपूर रोड, नाशिक येथे सकाळी ८.३० ते ५ वाजे पर्यंत मतदान होणार आहे.
कार्यकारिणी पदासाठी महेश मालवी, राघवेंद्र जोशी, महेन्द्र (राजू) आहेर, जी उगले, रौफ पटेल, अनिरुद्ध भांडारकर, निखिल टिपरी,नजगन्नाथ पिंपळे, विनायक रानडे, बाळासाहेब मंडलिक, महेश भामरे या 11 जणांचे अर्ज आले आहेत. तर हेतल पटेल, विलास झेंडफळे, संजय परिडा, नीलेश चव्हाण, योगेश कमोद, गणेश कुशारे या सहा जणांनी माघार घेतली. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणूकी साठी ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्स निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहे.