टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी काल ट्विटर खरेदी करार रद्द केला. सुमारे 44 अब्ज डॉलरचा करार रद्द करण्यात आला आल्याने ट्विटरला मोठा धक्का बसला आहे.

एलन मस्क यांच्या वकिलांनी सांगितले की, ट्विटर अनेक विनंत्या करूनही बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यात अयशस्वी झाले. “मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे ते असे करत आहेत. ट्विटरने एलन मस्क यांना चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा करार त्यावरच अवलंबून होता,”. ट्विटरने त्या करारातील अनेक तरतुदींचे भौतिक उल्लंघन केले आहे. त्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे असे दिसते ज्यामुळे इलॉन मस्क यांना करार रद्द करण्यास प्रवृत्त केले, असेही त्यांनी सांगितले.
एलन मस्क यांनी सांगितले की, ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या, ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धती आणि कारवाई करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती हा करार होण्यासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. या संदर्भात एलन मस्क आणि त्यांची टीम गेल्या 2 महिन्यांपासून सतत ट्विटरवर संपर्क साधून माहिती घेत होती. पण प्रत्येकवेळी ट्विटरचे बोर्ड एकतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होते किंवा अपूर्ण माहिती देत होते.
त्यामुळे हा खरेदी करण्याचा करार पूर्णपणे रद्द केला. एलन मस्कच्या टीमने 5 वेळा माहिती मागवली. त्याला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एलन मस्कच्या टीमच्या म्हणण्यानुसार, ट्विटर बरीच माहिती लपवत आहे. कारण ट्विटरच्या कमाईपैकी 90 टक्के जाहिरातींमधून येते.
ट्विटर आणि मस्क यांच्यातील खरेदी करारानुसार, करार रद्द झाल्यास, मस्क यांना अटींनुसार 1 अब्ज डॉलर करारापोटी शुल्क द्यावे लागेल. पण मस्क फक्त ब्रेक-अप फी भरुन सुटू शकत नाहीत. करारात अशी तरतूद समाविष्ट आहे जी मस्क यांना करार पूर्ण करण्यास भाग पाडू शकते. याचा अर्थ मस्क आणि ट्विटरमध्ये आता प्रदीर्घ कायदेशीर लढाई होऊ शकते.
आता ट्विटरकडून असे सांगण्यात आले आहे की कंपनीला हे विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. कराराची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटर बोर्ड कायदेशीर कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी म्हटले आहे.