मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (bollywood actor arjun kapoor) आज त्याच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावनिक झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये आईसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. अर्जुन कपूरची आई मोना कपूर यांचा 2012 मध्ये (mona kapoor) कॅन्सरच्या (cancer) आजारामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून अर्जून आईबद्दलच्या आठवणी नेहमी फेसबुक (facebook)आणि इंन्स्टाग्रामच्या (instagram) माध्यमातून चाहत्यांना सांगत असतो. त्यावरून त्याचे आईचे प्रेम किती दृढ होते हे लक्षात येत. आज 3 फेब्रुवारी असून आज त्याच्या आईचा वाढदिवस आहे. अर्जुनने पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींकडून (celibrity) त्याला आधार दिला गेल्याचे पाहावयास मिळत असून सकाळपासून नेटक-यांमध्ये अर्जुनच्या पोस्टची चर्चा आहे.

अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर आईचा एक फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. माझ्या फोनवर तुझे नाव दिसणे, घरी आल्यावर तुझ्याजवळ बसणे या सर्व गोष्टींची खूप आठवण येते. तू आणि अंशुलाच्या तासंतास गप्पांची खूप आठवण येते. मला तुझी खूप आठवण येते आई. तू मला हाक मारणे, तुझ्यासमोर एखाद्या लहान मुलासारखे वागणे आणि तुझे मला सांभाळणे, तुझ्यासोबत हसणे मला आठवते. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आई. आशा करतो की मला आज जे यश मिळत आहे त्याने तुला अभिमान वाटत असेल. असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
http://https://www.instagram.com/p/CZfERkarrK7/?utm_source=ig_web_copy_link
तसेच एकीकडे अर्जुन कपूरची ही भावुक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे अर्जुनची बहीण अंशुलानेही आईसाठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मला माझी आई परत हवी आहे. दुःख आणि भावनांना खऱ्या आयुष्यात कोणत्याही सीमा नाहीत. १० वर्ष झाली पण प्रत्येक दिवशी फक्त ठीक वाटावे म्हणून एवढे काम करावे लागत आहे. असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सकाळपासून अर्जुनची पोस्ट चांगली चर्चेची ठरत असून प्रत्येकजण त्यांच्या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अर्जुनची गर्लेफ्रेंड मलायका अरोरा हीने सुध्दा कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.