मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळख असलेल्या राखी सावंतने (Rakhi Sawant) बिग बॉस 15 घरात पती रितेशची सर्वांना ओळख करून दिली होती. त्याच रितेशपासून राखीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.याबाबतची माहिती तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली.

राखी सावंतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने एक लांबलचक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने पती रितेशपासून वेगळे होत असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, आमच्या दोघांमधील समस्या संपवण्याचा प्रयत्न केला. पण यात आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामुळेच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

http://https://www.instagram.com/p/CZ65kHePCho/?utm_source=ig_web_copy_link
राखी सावंतने आपल्या नोटमध्ये लिहिले, ‘सर्व चाहते आणि माझ्या प्रिय व्यक्तींना मी सांगू इच्छिते, मी आणि रितेश एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाच्या बाहेर होत्या. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. मात्र अखेर आम्ही आमचे आयुष्य वेगवेगळं जगण्याचा निर्णय घेतला आहे.’
राखीने या नोटमध्ये पुढे लिहिले की, ‘हे सर्व व्हॅलेंटाइन डेच्या अगदीच अगोदर घडले त्यामुळे मी खूप दुःखी आहे. पण एक निर्णय तर घ्यायचाच होता. पण मी प्रार्थना करते की रितेशसोबत सर्वकाही चांगले होऊ दे. मला आता कामावर फोकस करायचे आहे. मला आनंदी आणि निरोगी राहायचे आहे. मला समजून घेण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद.’
दरम्यान राखीचे खासगी आयुष्य आत्तापर्यंत अनेकदा वादविवादीत राहिले आहे. कारण आज तागायत तिचे नाव अनेकांसोबत जोडले असल्याचे ऐकण्यात आले होते. त्यामुळे राखीचे करिअर सुध्दा वादीत राहिले आहे. राखीने रितेश संगसोबत लग्न केले होते. मध्यंतरी त्यांचे खूप चांगले चालल्याची देखील चर्चा होती. पण काल राखीने रात्री अचानक विभक्त होणार असल्याचे जाहीर केल्याने तिच्या काही चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी राखीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉग 15 मध्ये पहिल्यांदा पती राकेश सोबत दिसली होती. त्यावेळी दोघांनीही एकसारखे कपडे घातले होते. त्यामुळे दोघांच्यात खूप चांगले चालले असल्याचे वाटत होते.