मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये गारठा वाढला असून यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. अशात सोमवारी (दि. २३) मुंबईचे तापमान २६.५ सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर पुण्यामध्ये ३१.२ सेल्सिअस आणि नाशिकमध्ये २८.५ सेल्सिअसपेक्षा थंड तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर या दोन्ही शहरांमध्ये रात्रीचे तापमान मात्र मुंबईपेक्षा कमी होते, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, (IMD) येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाशिक आणि पुण्यापेक्षा देखील मुंबईत थंडी वाढणार असून पारा घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे पुढचे काही दिवस हे मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणार आहे. तसेच कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार, किमान दिवसाचे तापमान हे सामान्यापेक्षा ४ ने कमी होते. तर रात्रीचे तापमान १७.५ सेल्सिअस आणि १५.६ सेल्सिअस इतके होते. याच्या तुलनेमध्ये पुणे आणि नाशिकमध्ये रात्रीचे तापमान ११.७ आणि ११ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, यंदा मुंबईत नागरिकांनी तडाख्याच्या थंडीचा अनुभव घेत आहे. यामुळे सोशल माध्यमांवरही #Mumbai #winter असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. तर गेल्या १० वर्षात अशी थंडी पाहिली नाही असे देखील नेटकऱ्यांनी म्हटले आहे. मुंबईत आणखी तापमान वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.