अग्निपथ योजनेविरोधात तरूणांना चिथावणी देणार्‍या माजी सैनिकाला बेड्या

ग्वाल्हेर (भ्रमर वृत्तसेवा) :- सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला अनेक राज्यातून हिंसक विरोध झाला आहे.

या विरोधासाठी तरूणांना चिथावणी देणारे चेहरे आता उघड होत आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये या प्रकरणात पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे. मनोज असे या सैनिकाचे नाव असून तो फिजिकल ट्रेनर आहे.

मनोजने अग्निपथ योजनेच्या विरोधात तरूणांना भडकावले आणि त्यानंतर त्यांना गोला मंदिरामध्ये एकत्र येण्याची सूचना केली होती. या आंदोलनाच्या दरम्यान मनोज तिथे उपस्थित असल्याचे पुरावे सीसीटीव्हीमध्ये सापडले होते. या पुराव्याच्या आधारावर त्याच्यावर एफआयआयर दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!