शिवपुत्र संभाजी महानाट्यानिमित्त सिटीलिंकच्या वतीने जादा बसेस; “असे” आहे बसेसचे नियोजन

 

नाशिक :- शहरात २१ ते २६ जानेवारीपर्यंत होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या बलिदानापर्यंतचा दिव्य इतिहास मांडण्यात आला आहे.

साधुग्राम येथील स्व. बाबूशेठ केला मैदानात हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्याचा नाशिककरांना लाभ घेता यावा व या माध्यमातून शिवशंभुंची प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सिटीलिंकने देखील पुढाकार घेतला आहे.

त्यासाठी सिटीलिंकच्या वतीने दि. २१ ते २६ जानेवारी दरम्यान जादा बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण २४ बस फेर्‍या शहरातील विविध भागातून तपोवनपर्यन्त देण्यात आल्या आहेत. नाटक संपल्यानंतर परतीसाठी १२ बस फेर्‍या तपोवन पासून शहरातील विविध भागापर्यंत देण्यात आल्या आहेत.

महानाट्य बघण्यासाठी प्रवाश्यांना जाता यावे यासाठी २४ जादा बस फेर्‍यांचे नियोजन पुढीलप्रमाणे –
१) मार्ग क्रमांक १०१ (बारदान फाटा ते तपोवन) – १६.०५, १६.४५, १७.०५, १७.४५ वाजता.
२) मार्ग क्रमांक १०३ (सिंबोईसीस ते तपोवन) – १६.२५, १६.४५, १७.००, १७.२० वाजता.
३) मार्ग क्रमांक १०४ (पाथर्डी गाव ते तपोवन) – १६.१५, १६.४५, १६.५०, १७.२० वाजता.
४) मार्ग क्रमांक १०७ (अंबड ते तपोवन) – १६.२०, १६.५०, १७.१०, १७.४० वाजता.
५) मार्ग क्रमांक १०६ (अमृतानगर ते तपोवन) – १६.१५, १६.३०, १७.००, १७.४५ वाजता.
६) मार्ग क्रमांक २६६ (नाशिकरोड ते तपोवन) – १६.३०, १६.५०, १७.१५, १७.३५ वाजता.

तसेच महानाट्य संपल्यानंतर नागरिकांना घरी जाणे सोयीचे व्हावे यासाठी १२ जादा बस फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे
१) मार्ग क्रमांक १०१ (तपोवन ते बारदान फाटा) – २२.०० वाजता (२ बसेस)
२) मार्ग क्रमांक १०३ (तपोवन ते सिम्बोईसीस) – २२.०० वाजता (२ बसेस)
३) मार्ग क्रमांक १०४ (तपोवन ते पाथर्डी गाव) – २२.०० वाजता (२ बसेस)
४) मार्ग क्रमांक १०६ (तपोवन ते अमृतानगर) – २२.०० वाजता (२ बसेस)
५) मार्ग क्रमांक १०७ (तपोवन ते अंबडगाव) – २२.०० वाजता (२ बसेस)
६) मार्ग क्रमांक २६६ (तपोवन ते नाशिकरोड) – २२.०० वाजता (२ बसेस)

‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यानिमित्त नियोजित या जादा बसफेर्‍यांचा जास्तीत जास्त प्रवाश्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!