जम्मू-काश्मीरच्या बिलावरमध्ये भीषण अपघात; “इतके” जण जागीच ठार

बिलावर : जम्मू-काश्मीरमधील बिलावर जिल्ह्यामधील धनू पॅरोल गावात शुक्रवारी (दि. २०) झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. १५ जखमींना बिलावर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौगहून डन्नू पॅरोलला घेऊन जाणारे वाहन सिला येथे खाली आल्यानंतर खोल दरीमध्ये कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सुरुवातीला ४ जण ठार झाले होते. तर पाचव्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हंसराज, बंटू, अजित सिंग, अमरू आणि काकू राम अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बिलावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!