बुलढाण्याजवळ खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; “इतके” जण ठार

बुलढाणा : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात (बस क्र. MH 20 EL4999) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. म्हणजे एकूण २१ प्रवासी जखणी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हा अपघात रात्री साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामधील ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सहा प्रवाशांना जालन्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!