सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर आज (दि. १९) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. कणकवली येथे खासगी बस उलटून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा हायवेवर गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोपोली गावाजवळ पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रक आणि चारचाकीचा हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक चार वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावली आहे. गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ व पोलीस यांच्या सहकार्यमुळे मुलाचे प्राण वाचले.

ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त चारचाकी मुंबईवरून खेडला जात होती. याचदरम्यान ट्रक आणि या चारचाकीची धडक झाली. अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातग्रस्त चारचाकी मुंबईवरून खेडला जात होती. याचदरम्यान ट्रक आणि या चारचाकीची धडक झाली.