मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- भारत आणि यजमान आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर होणार आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघातील काही खेळाडू सध्या इंग्लंड दौर्यावर असल्यामुळे बहुतेक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आयर्लंडमध्ये दाखल झालेला आहे.
आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या संघाने रविवारी (26 जून) झालेला पहिला सामना सात गडी राखून जिंकला. पहिला सामना जिंकल्याने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताला 1-0 अशी आघाडी मिळालेली आहे. आज होणारा दुसर्या आणि शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या खिश्यात घालण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. तर, यजमान हा सामना जिंकून मालिका बरोबरी सोडण्याचा प्रयत्न करतील.