मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच सलमान खान सलमान खान हा कायमच प्रसिद्धी झोतात असतो. निरनिराळ्या कारणांमुळे तो चर्चेचा विषय ठरत असतो. भाईजानचा चाहता वर्गही मोठ तगडा आहे. त्यासोबत त्याचे काही विरोधी देखील आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली होती. सलमाननं शस्त्र परवाना संदर्भातही अर्ज केला होता.
सलमानला जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता.
अखेर सलमानला आत्मसंरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडून शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे. सलमाननं 1 वर्षांपूर्वी शस्त्र परवानासाठी केले होते. अप्लिकेशन मात्र त्यावेळी त्याला परवानगी देण्यात आली नाही.