दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेन अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे हे बैठका घेत आहेत. त्यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. आता तर नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुढचं पाऊल काय असणार? याविषयी मोठी चर्चा सुरु होती. या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच आपण पुढे काय करणार याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ते शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीचा ते आढावा घेत पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत.

शिवसेना बंडखोरांविरोधात आता ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या जागेवर पर्यायी आणि सशक्त उमेदवारांना शोध करा, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पक्ष बांधणीवर उद्धव ठाकरे यांनी जोर दिला असताना बैठकांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. शिवसेना भवन येथें आज ही बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!