पवईतील एका शॉपिंग मॉलला भीषण आग

मुंबई :- पवई येथील एका शॉपिंग मॉलला आज पहाटे आग लागली. पवईच्या हिरानंदानी मध्ये हिक्को पॅलेस शॉपिंग मॉल आहे. हा मॉलला सकाळी सहा वाजेच्या आसपास आग लागली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग मोठी असल्याने अग्निशमन केंद्राचे 12 बंब आग विझविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, आगीत मॉलमधील सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, पवईच्या हिरानंदानी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सुपरमार्केटमध्ये सकाळी जवळपास सहा वाजून 15 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली होती. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1544889414882820097?t=owG13Je-U9uUAIKgKfsA8Q&s=19

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!