मास्टर मॉलला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक :- शहरातील गंजमाळ परिसरात असलेल्या मास्टर मॉल ला भीषण आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मास्टर मॉलला आग लागली होती. ही आग विजविण्यासाठी शिंगाडा तलाव, सातपूर, पंचवटी व सिडको येथील प्रत्येकी 1 बाऊजर घटनास्थळी दाखल असून 4 तासांनंतरही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी करीत आहेत.

आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!