जयपूर (भ्रमर वृत्तसेवा) :– पाच रुपयांच्या लिंबावरुन झालेल्या वादात दुकान मालकाने ग्राहकावर गोळ्या झाडल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये ही घटना घडली आहे. राजस्थानमधील भरतपूरजवळ बहज गावात 5 रुपयांच्या लिंबू घेण्यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद इतका वाढला की, दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश जाटव (वय 30) यांचा मुलगा रामजीत हा संध्याकाळी महेंद्र बच्चू यांच्या दुकानात लिंबू घेण्यासाठी गेला होता. जिथून त्याने 100 रुपये देऊन 5 रुपये किमतीचे लिंबू विकत घेतले. सुट्टया पैशाच्या कारणावरून दिनेश आणि महेंद्र यांच्यात वाद आणि शिवीगाळ झाली. यानंतर दुकानदाराचे साथीदार रात्री 8.30 वाजता दिनेशच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार केला. दिनेशच्या कानाला लागून गोळी निघून गेली.