नवी दिल्ली :- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.
नारा येथील रस्त्यावर ते भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले असून या हल्ल्यात शिंजो आबे जखमी झाल्याचे वृत्त जपान येथील एका दैनिकाने दिले आहे.
या गोळीबारात ते जखमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.