आपल्या सर्वांना वाटते, ना की आपण एकमेकांना क्षमा करावी, सर्व जण क्षमाशील असावेत, असे जग असावे, की जेथे कोणीही कोणावर टीका करणार नाही, इतरांच्या चुका पोटात घालतील, कोणी कुणाला कमी लेखणार नाही, कोणाचा कमीपणा बघून नकारात्मक विचार करणार नाही, असे विश्व जेथे भिन्न भिन्न स्वभाव, संस्कार असूनही प्रत्येक जण शांत राहील आणि आपसात प्रेम असेल.

आध्यात्मिक ज्ञान आणि समज यांच्या आधारे काही गुण जे क्षमाशील बनवतात.
जसे उदारता, दया – इतरांच्या चुका विसरून जा.
मोठेपण मन मोकळेपणाने बोलणे – इतरांना सामावून घ्या
कृतज्ञता आभार मानणे – आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या
सहनशक्ती – इतरांच्या कमजोरीकडे सहजतेने बघा
शुभभावना- सर्वांचे शुभ चिंतक
स्वीकृती – इतरांचे गुण आत्मसात करा
जे जसे आहे तसे स्वीकार करा.
दाता देणे – इतरांना सद्गुणांचे दान द्या
हे सद्गुण अनुभवण्यासाठी, म्हणजेच क्षमाशीलता व्यवहारात आणण्यासाठी, आपल्याला शांती, प्रेम आणि सत्याच्या शक्तीची आवश्यकता आहे.
या तिन्ही शक्ती असतील, तर क्षमा करू शकू, रागाच्या भावना शांत करता येतात, ज्यामुळे मनुष्य शांत होतो. क्षमा हे रागावर उपचार करणारा मलम आहे, हे आपल्याला माहीत आहे; परंतु माफ करण्यासाठी, प्रथम आणि सर्वात महत्त्वाची शक्ती आवश्यक आहे ती म्हणजे उग्र भावनांना नियंत्रित करणे. भावनांवर नियंत्रण करण्यासाठी दर तासाला एक मिनिट शांत बसा आणि आपल्या विचारांकडे लक्ष्य द्या. वेगवेगळ्या व्यक्तिशी भेटतांना,व्यवहार करताना विचारांचा विचारांचा वेग वाढतो. गेल्या तासाभरात जेव्हा एकमेकांचे बोलण्यात,व्यवहारात नकारात्मक येते, तेव्हा संघर्ष होतो आणि परिस्थिती आणखी वाईट होते. म्हणून, प्रत्येक तासाला, एक मिनिटाचे ध्यान करा, मनाचे विचार शांत करण्यासाठी ही पहिली पायरी आहे.
जेव्हा तुम्ही एक मिनिट ध्यानाला बसाल तेव्हा विचार करा – मी एक शांतस्वरूप आत्मा आहे, कपाळाच्या मध्यभागी असलेला एक सुंदर लाल-सोनेरी तारा आहे. मी माझ्या सभोवतालच्या वातावरणात शांततेचे प्रकंपन पसरवत आहे. मी शांतीचे सागर परमात्म्याची संतान आहे. माझ्या कार्यालयातील, माझ्या कुटुंबातील, जगातील सर्व लोक शांतिच्या सागराची मुले आहेत, त्यांचा मूळ स्वभाव शांत आहे.
आपण सर्वांनी एकत्रितपणे, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात शांततेचे वातावरण निर्माण केले पाहिजे, जेणेकरून आपण सर्वांजण मिळून क्षमाशील जग निर्माण करू शकू.

अशा प्रकारे दररोज 15 मिनिटे शांतता (प्रत्येक तासाला एक मिनिट) जमा करा. ही 15 मिनिटे जी तुम्हाला तुमच्या मनातील उग्र भावनांना आवर घालण्यासाठी उपयोगात येतील. एक महिना मनापासून हा प्रयत्न करा. जर तुम्ही रोज प्रयत्न केला तर केवळ तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणार नाही तर भावनांचा उगम आहे जो तुमचा संतापाचा संस्कार आहे त्याला बरे करून भावनांचा वेग कमी करेल आणि त्याचे रूपांतर क्षमाशीलतेचा संस्कार बनेल, कारण शांतीचे विचार केवळ आपल्या भावनांना शांत करत नाहीत तर दीर्घकाळासाठी आपले संस्कार शांत होतात.
भारतात एक म्हण आहे की ज्या घरात क्रोधी असतो तिथे पाण्याचे माठ पण सुकतात. राग म्हणजे मनात असलेल्या इच्छा जे क्षमा करू देत नाही. मन प्रेमाने भरले तर सूक्ष्म इच्छांच्या भावना शांत होतात. शांती जेथे आहे तेथे क्षमाशील वातावरण निर्माण होते, ही दुसरी पायरी आहे. समाधानी आहे राहा. मला हे हवे, मला ते हवे आहे, हे माझ्या मालकीचे आहे, दुसर्यांकडून अपेक्षा करतो, मी बरोबर आहे, कुणाचा हेवा वाटतो – ही सूक्ष्म क्रोध अग्नी आहेत जी शुद्ध प्रेमाची शक्ती नष्ट करते, शुद्ध प्रेम आपल्यात आहे, कारण आपण सर्व प्रेमाचे सागर परमात्म्याची मुले आहे.
म्हणून सकाळी उठताच परमेश्वराचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. या प्रेमाच्या सागराला गुड मॉर्निंगने सुरुवात करा आणि त्याच्याशी मनापासून बोला. या संपूर्ण विश्वात असलेल्या सर्वांत शुद्ध प्रेमाने स्वतःला भरून घ्या, विविध भावनांपासून शुद्ध होण्यासाठी माझा मार्ग मोकळा होत आहे. कारण मी जेवढे जास्त परमात्मा प्रेमाने मन भरते, तितकेच ते प्रेमाने समृद्ध होत जाते आणि नम्र होतो, मग प्रत्येकाची मने जिंकण्यास आणि सभोवताली प्रेम आणि क्षमाशीलतेचे वातावरण निर्माण करण्यास सक्षम बनते.
सत्याच्या सामर्थ्याशिवाय क्षमाशील होऊ शकत नाही. शांतता आणि प्रेम आपल्या भावनांचे रूपांतर करत असताना, आपण एखाद्या व्यक्तीला क्षमा करतो किंवा ज्याने आपल्यावर अन्याय केला आहे त्याबद्दल राग येत नाही. जे सहन करतो, क्षमा करतो, परंतु ते अधूनमधून उद्रेक करून त्याच्या दबावाला बळी पडतात. दबावाला बळी न पडता आनंदाने करण्यासाठी अध्यात्मिक बुद्धीची आवश्यकता असते. कालांतराने, अशी व्यक्ती सत्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होते आणि कठीण व्यक्तिमत्त्वाच्या दबावांना तोंड देण्यास समर्थ असते. सत्यावर आधारित काही प्रचलित म्हणी आहेत – जो सत्यवादी आहे तो आनंदात नाचतो, सत्याची नाव हालते-डोलते; पण बुडत नाही, सत्यमेव जयते. असा माणूस सहज क्षमा करू शकतो आणि क्षमाशील विश्व निर्माण करण्यास मदत करतो.
ब्रह्माकुमारी पुष्पादीदी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय