नाशिक :- जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांच्या अनामत रकमेपैकी 22 लाख रुपये रकमेचा जिल्हा परिषदेच्या तत्कालीन रोखपालाने अपहार केल्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग (पश्चिम) अंतर्गत सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी रघुनाथ विठ्ठल गवळी यांनी या प्रकरणी काल भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन रोखपाल तथा कनिष्ठ लिपिक रवींद्र बाबूलाल ठाकरे याने दि. 26 डिसेंबर 2018 ते 9 ऑक्टोबर 2020 या काळात वरील विभागात रोखपाल होते. या काळात नाशिक जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील आरहन व संवितरण अधिकारी यांचे स्टेट बँकेतील खात्यातून ठेकेदारांच्या अनामत रकमेचा अपहार केला.

22 लाख 21 हजार 500 एवढ्या रकमेची शासनाची व फिर्यादीची फसवणूक केली अशा फिर्यादिवरून काल रात्री उशिरा भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. अहिरे करीत आहेत.