खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नऊ वर्षानंतर अटक

नाशिक (प्रतिनिधी):- तब्बल नऊ वर्षापूर्वी 4 मार्च 2013 रोजी मेहबूब नगर वडाळा येथे एकाचा खून करून फरार झालेल्या उत्तरप्रदेशच्या आरोपीस अटक करणे, गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला यश आले.

याबाबत माहिती अशी की, अज्ञात आरोपींनी सलाम नावाचे इसमास गळा आवळून ठार केले व रूमला बाहेरून कुलुप लावून आरोपी फरार झाले, अशी तक्रार इंदिरानगर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.तेव्हापासून आरोपी नामे मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी(मूळ रा. रामपूर अरुणा, पोस्ट सादुल्ला नगर, जिल्हा बलरामपुर, उत्तर प्रदेश) हा साथीदारांसह फरार झाला होता.

.गेल्या 2 ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना सदर आरोपी हा मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे समजले. त्यावरून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, पोलीस हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पालखेडे यांचे पथक मुंबईकडे रवाना झाले. तपासाअंती नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घनसोली परिसरातून आरोपी मंगरू चौधरी यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी इंदिरा नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथकाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!