मुंबई : येथे घाटकोपरमध्ये एका गतिमंद मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला ओढत नेले. यामधील एकाने पीडितेवर बलात्कार केला. तर, इतर दोघांनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा जबाब नमुद करण्यात आले आहे.

आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. याबाबतचे काही व्हिडिओ पीडितेच्या भावाने सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तातडीने धाव घेतली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भादवि कलम पोस्को तसेच आयपी अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. तसेच आरोपींची रवानगी बाल सुधारगृहामध्ये करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.