गंगाथरन डी. यांनी स्वीकारला नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

नाशिक :- शासन आदेशानुसार आज गंगाथरन डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी तर सूरज मांढरे यांची पुणे येथे राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात पदभार स्वीकारण्याची व सोपवण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीनकुमार मुंडावरे, गणेश मिसाळ, भीमराज दराडे, वासंती माळी, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!