नाशिक (प्रतिनिधी) :- आपल्यासोबत राहिली नाही, तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणीच्या इच्छेविरुद्ध आरोपी तरुणाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, या तरुणीचे आई-वडील तिचे लग्न जमविण्याचा प्रयत्न करीत होतेे; मात्र आरोपी तरुणाने हे लग्न जमू दिले नाही, तसेच या आरोपी तरुणाने “तू माझ्यासोबतच राहायचे. मी तुला माझी दुसरी बायको म्हणून ठेवीन. तू जर माझ्यासोबत राहिली नाहीस, तर तुझे अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल करीन,” अशी धमकी दिली, तसेच तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार दि. 1 सप्टेंबर 2016 ते 3 मार्च 2022 यादरम्यानच्या काळात नाशिक व पुणे येथे घडला. तरुणाच्या या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एन. जाधव करीत आहेत.