Home Latest लासलगाव आगारातील एसटी बसवर अज्ञात इसमांची दगडफेक

लासलगाव आगारातील एसटी बसवर अज्ञात इसमांची दगडफेक

0

लासलगाव :- लासलगाव आगारातील एसटी बसवर मोटारसायकल वरील दोन अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याने बसची काच फुटून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज दुपारी दीड वाजता लासलगाव आगारची बस क्रमांक – MH40N8831 ही चालक दादा रामभाऊ आहेर व वाहक- सचिन वाल्मिक गवळी हे 11 प्रवासी असे तेरा जण बसमध्ये असताना चांदवड ते लासलगाव मार्गावर धावत असताना पिरसाईबाबा थांब्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तीने बसवर दगड मारल्याने समोरील दर्शनी काच फुटली. यामुळे बसचे अंदाजे दहा हजार रूपयाचे नुकसान झाले.

एसटी बस लचा संप चालू असताना लासलगाव आगारातील 210 कर्मचाऱ्या पैकी 20 कर्मचारी 29 तारखेला संपातून बाहेर पडले व कामावर रुजू झाले होते. रोज 2 फेऱ्या लासलगाव ते चांदवड व 2 फेऱ्या लासलगाव ते निफाड अश्या फेऱ्या आगरप्रमुख यांनी कालपासून चालू केल्या होत्या. आज चांदवडवरून लासलगावहुन येणारी बस क्रमांक एम एच 40 एन 8831 ह्या बसवर अज्ञात 2 जणांनी समोरून दगडफेक केली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दगडफेक चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत झाल्यामुळे डेपो मॅनेजर व कर्मचारी यांनी चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सर्व माहिती दिली.