नाशिक (प्रतिनिधी) : – गेल्या चार दिवसांपासन शहर व जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले असून, सोमवारी (दि.11) रोजी पहाटेपासूनच शहरात पावसाची संततधार अद्यापही सुरू आहे. त्यामुळे गोदेला देखील पाणी सोडण्यात आले.

सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, गंगापूर धरणातूनही विसर्ग सोडण्यात आला. यामुळे गंगाकाठच्या व्यापार्यांना आपले दुकाने बंद करावी लागली असून, तेथील टपर्याही हलविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कपालेश्वर परिसरातही पाणी आले असल्याने नागरिकांना सावधनातेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सांडव्यावरील देवीच्या मंदिरातही आता पाणी घुसल्याचे चित्र असून, पूर बघण्यास नागरिकांनी गर्दी केली आहे.

पूराचे पाणी वाढले असल्याने रामसेतू पूलही बंद करण्याच्या तयारीत प्रशासन असल्याचे समजते.