मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. तर आज चांदीच्या दरातही घसरणीची नोंद झाली आहे.
दहा ग्रॅम सोने आज 50803 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 54402 रुपयांना विकली जात आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50803 रुपये प्रति दहा ग्रॅमवर खुला झाला आहे. शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 50816 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोमवारी सोन्याचा दर 13 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.