नाशिक (प्रतिनिधी) :- वयाच्या अवघ्या साडेसोळाव्या वर्षी चंदुलाल शाह यांनी पाक्षिकाच्या स्वरूपात ‘भ्रमर’ ची सुरुवात केली. पुढे साप्ताहिक ते सायंदैनिक असा मोठा पल्ला गाठला आहे. या वाटचालीत भ्रमर हे फक्त दैनिक राहिले नाही तर ते कुटुंब म्हणून उभे राहिले. अनेक लोक येऊन जोडली गेली. परिवार मोठा झाला. मात्र, या वाटचालीत नात्यांमध्ये कुठेच दुरावा, कटुता मुळीच आली नाही.

उलट बदलत्या काळात सगळ्यांना सोबत घेत परिवाराने अनोखा आदर्श निर्माण केला आहे. याच सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत भ्रमरचा सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा कालिदास कला मंदिरात थाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांनी भ्रमरवर प्रेमाचा वर्षाव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच भ्रमरने आगामी काळात आपल्या कक्षा रुंदाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करीत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार हेमंत टकले, आ. सीमा हिरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, अॅड. विलास लोणारी, दिपक बिल्डर्सचे संचालक दिपक चंदे, सम्राट ग्रुपचे संचालक सुजॉय गुप्ता, ललित रुंगटा ग्रुपचे संचालक अखिल रुंगटा व रासबिहारी स्कूलचे सचिन साबळे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना ना. छगन भुजबळ म्हणाले, की आज वृत्तपत्रांची संख्या वाढलेली आहे. काही वृत्तपत्रे हे वेगवेगळ्या पक्षांच्या दबावात काम करताना दिसतात. भ्रमर मात्र कोणाच्याही दबावात काम करीत नाही. पीत पत्रकारितेशी त्यांचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही. मी अनेक दैनिकांच्या कार्यक्रमाला जात असतो. कधी ते आमच्याविषयी चांगले लिहितील म्हणूनही जात असतो. आज मात्र मी भ्रमरवर असलेल्या प्रेमातून येथे आल्याचे सांगितले. आजच्या दैनिकांच्या स्वरूपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की सगळे विषय या दैनिकातून आज मांडले जात आहेत. ज्याचा जो विषय आवडीचा असेल, त्याला त्या विषयाचे वाचायला मिळते. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे पाहिले असता दैनिकात दिसणारी गंभीरता मात्र तेथे पूर्णपणे नाहीशी झालेली दिसते. बातमी सांगताना प्रचंड घाई दिसते. चूक झाली तरी खुलासा सांगण्याची पद्धत टीव्हीवर दिसत नाही. सोबतच लोकांचे प्रश्न मांडताना मुळीच दिसत नाहीत. सध्या महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे ज्वलंत प्रश्न असताना हनुमानाचा जन्म कुठे झाला यावर चर्चा, आंदोलने होताना दिसत आहे. हनुमानावर माझी श्रद्धा आहे, मग त्यांच्या जन्मावरून वादाचा विषयच येत नाही; मात्र तरीही सध्या त्यावर वाद सुरू आहे. विशेष म्हणजे लोकही हे सगळे आवडीने पाहत असल्याचे दिसत आहे, हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
‘असे’ साजरे होणार सुवर्णमहोत्सवी वर्ष
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंदुलाल शाह यांनी भ्रमरचा अवघा इतिहास उलगडून सांगितला. सुरुवातीला वयाच्या अवघ्या साडेसोळाव्या वर्षी भ्रमर पाक्षिक म्हणून सुरू केला तेव्हा अनेकांना तो पोरकटपणा वाटला. काहींनी टिंगल केली. तर काहींनी साथ दिली. यातूनच दोन वर्षांमध्ये पुढे भ्रमर साप्ताहिक म्हणून सुरु केले. तेव्हा युद्धाचा काळ होता. या युद्धातल्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. तेव्हा सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. लोकांची हीच गोष्ट ओळखून त्या काळात भ्रमरने सायंकाळी छोटे अंक काढले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दहा हजारहून अधिक अंक तेव्हा विकले गेले. तेव्हा फारसा पुढचा विचार न करता पुढे भ्रमर सायंदैनिक म्हणून निघू लागले. एक शिपाई आणि मी एवढ्याच शिदोरीवर अंक निघू लागला. तेव्हाही मित्र धावून आले आणि वार लावून अंक काढला जाऊ लागला. पुढे लोकांची साथ मिळाली आणि प्रवास सुरु झाला. अनेक लोक जोडले गेले यातूनच “सर्वांसाठी आपण आणि आपल्यासाठी सर्व” ही संकल्पना मांडली. भ्रमर परिवार मोठा होत गेल्याचे शाह यांनी सांगितले.
भ्रमरचा सुवर्णमहोत्सव साजरा करतांना वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी हे कार्यक्रम असणार आहेत. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, महाविद्यालयातील मुलांसाठी वादविवाद स्पर्धा, शालेय मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा यांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय कोरोनाचा भयंकर काळ बघितल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्या सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वृत्तपत्रांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनाचा काळ हा प्रिंट मीडियासाठीही आव्हानात्मक गेला आहे. अनेक दैनिक ही आर्थिकदृष्ट्या संकटात सापडली आहेत. ही गोष्ट लक्षात घेता सरकारकडून वृत्तपत्रात दिल्या जाणार्या जाहिरातीचे दर वाढविण्याची विनंती त्यांनी केली. जेणेकरून दैनिकांना मदत होईल. त्यांची अस्तित्वाची लढाई थोडी सोपी होईल. कोरोना काळात भ्रमरने डिजिटल युगातही प्रवेश केला असून, आज लाखो लोकांपर्यंत रोजच्या महत्वाच्या बातम्या त्या माध्यमातून पोहोचत आहे. भ्रमरने आजपर्यंतच्या केलेल्या प्रवासात विक्रेते, वाचक, हितचिंतक, जाहिरातदार आणि कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. हा प्रवास त्यांच्यामुळेच शक्य झाला, असे शाह यांनी नमूद केले.
हे तर कौतुकास पात्र : बाळासाहेब थोरात
भ्रमरच्या सुवर्ण महोत्सव शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा भ्रमर परिवारसोबत परिचय झाला. या कार्यक्रमाला येण्याआधी भ्रमरची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही लोकांशी संवाद साधला. त्यावेळी सगळ्यांनीच चांगले लोक, चांगली संस्था अशीच माहिती भ्रमर विषयी दिली. यातुनच भ्रमरच्या कार्याची प्रचिती येते. कोरोना काळ, वाढता सोशल मिडियाचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वाढते जाळे या सगळ्यांचा प्रिंट मीडियावर परिणाम झालेला आहे. अनेकांना आपले अस्तित्व टिकवता आलेले नाही. मात्र, भ्रमर सातत्याने मेहनत घेत मोठ्या हिंमतीने दैनिक चालवत आहे ही नक्कीच कौतुकास्पद आहे. सोबतच भ्रमरने कधीही कुणाच्या दबावात काम केले आहे. कुठल्याही एका पक्षाला वाहून घेतले नाही. तर फक्त सत्याचीच बाजू घेतली आहे. आता भ्रमरची पुढची पिढी सुद्धा दैनिकात सक्रीय झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. तरुण मंडळी सहभागी झाल्यामुळे नव्या गोष्टी करण्याची ऊर्जा मिळत असते. चंदुलाल शाह हे दैनिकासोबतच निरीक्षणगृहाच्या माध्यमातून बालकल्याणाचे मोठे काम करीत आहे.
शाहसाहेब ही जबाबदारी तुमची : मधुकर भावे
सध्या मराठी पत्रकारितेची अवस्था अतिशय लाजिरवाणी झाली आहे. वृत्तपत्र उघडल्यानंतर ते वाचतांना ते द्वेषपत्र, सूड पत्र असल्याचे दिसून येते. दैनिकात जाहिराती खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. किंबहुना वृत्तपत्राचे अस्तित्व हे पूर्णपणे अवलंबून आहे. दैनिकाला संपादकाची गरज राहिली नसून अनेकदा तर वृत्तपत्र संपादकाशिवाय काढले जाते. मुंबईत अशी काही दैनिके आहेत, की ज्यांना संपादकच नाहीत; मात्र जाहिरातदार असल्यामुळे रोजचा अंक सुरळीतपणे निघत आहे. दुसरीकडे दैनिकातून लोकांचे प्रश्न आता मांडले जात नाहीत. सामान्य नागरिकांसाठी कुठलाही लढा व चळवळ उभी केली जात नाही. उलट फक्त नागरिकांना महत्त्वाच्या प्रश्नांपासून दूर करून दिशाभूल केली जात असल्याचे दिसते. तेव्हा हे चित्र बदलण्याची जबाबदारी काळाने शाह साहेबांकडे सोपविली आहे. त्यामुळे प्रामाणिक, तटस्थ आणि निर्भीड पत्रकारितेचा भ्रमरचा वारसा भविष्यात सगळ्यांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरणार असल्याचे भावे यांनी सांगितले.
भ्रमर एक आदर्श : सुधीर तांबे
भ्रमरच्या सुवर्णमहोत्सव शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होता आल्याचा मला अत्यंत आनंद आहे. हा सोहळा नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा आहे. या ठिकाणी विचार मांडले जात आहेत. हाच वेगळेपणा भ्रमर वाचतांना सुद्धा लगेच लक्षात येतो, असे प्रतिपादन आ. सुधीर तांबे यांनी केले. सोबतच पत्रकारिता करत असताना संवेदनशीलता सुद्धा भ्रमरने जपली आहे. इतर दैनिकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु असतांना भ्रमर मात्र सत्यता, तठस्थता आणि निर्भीडता या मूल्यांवर आधारीत काम करत आहेत. अनेकदा माध्यमांमधून लोकांनमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. भ्रमर मात्र दिशादर्शनाचे काम करत आहे. लोकांना सत्य सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय अनेकदा सामाजिक हित पाहता व्यवहार बाजूला ठेऊन भ्रमर कार्य करतांना दिसतो. लोकशाही यशस्वी होण्यासाठी काही व्यवस्था बनविण्यात आली. मग ती न्याय, कायदा, संसद असेल. यात माध्यमांची भूमिकाही खूप महत्वाची आहे. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम माध्यमांचे असून भ्रमर ते चोखपणे पार पाडत आहे. लोकांना सत्य सांगण्याचा, प्रबोधन करण्याचा प्रयत्न भ्रमरकडून सातत्याने होत असतो. निरीक्षणगृहाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदुलाल शाह यांच्यासोबत ओळख झाली. पुढे त्यांनी केलेली कामे सुद्धा पाहिली. ते पाहून असेच वाटते की त्यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असाच आहे.
हे तर एक आश्चर्य म्हणायला हवे : हेमंत टकले
नाशिककरांकडून मनोगत व्यक्त करताना माजी आ. हेमंत टकले यांनी सांगितले की, आतापर्यंत मराठी भाषेत अनेक सायंदैनिक निघाली आहेत. मात्र कुणालाही ती यशस्वीरीत्या चालवता आलेली नाही. किंबहुना 50 वर्षे तर मुळीच नाही. त्यामुळे भ्रमरचे हे आश्चर्यच म्हणायला हवे. सोबतच हा एक मोठा विक्रम सुद्धा आहे की 50 वर्षे वेगवेगळ्या संकटांचा सामना करत भ्रमरची वाटचाल सुरु आहे. भ्रमरच्या या यशामागे त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आहे. भ्रमरच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येकाला हा पेपर आपलासा वाटतो. जनसेवा करणारा पेपर अशीच भ्रमरची ओळख लोक लक्षात ठेवतील. त्याकाळी संध्याकाळच्या चहासोबतच भ्रमर वाचला जायचा. तेव्हाची ती गरज होती. जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी लिहिले आहे की, त्यावेळी भ्रमरचे पान खाऊनच बाहेर पडायचे असेच समीकरण होते.
तेव्हा भ्रमरच्या माध्यमातून एकत्र आलेली लोकं ही कोणी समाजातली मोठी माणसे नव्हती. पण त्यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसांसाठी चालवलेला पेपर होता. यातून माहितीच्या स्रोताची जपणूक करावी असेच ते स्वरूप होते. 10 वी चे निकाल आले की भ्रमरची नक्की आठवण येते. तेव्हा निकाल लवकर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भ्रमर होते. ही आठवण सगळ्यांच्या कायम स्मरणात राहणारी आहे.
भ्रमर आपल्याला आपलासा का वाटतो याचं उत्तर त्याच्या सामाजिक कार्यात आहेत. हा माणूस सगळ्यांना आपलासा का वाटतो. तर तो आपली भाषा बोलतो, कुठलेही तत्त्वज्ञान सांगत नाही, मी कोणी तरी आहे माझं ऐका असा मुळीच भाव नसतो. मित्रत्त्वाचा भाव असतो. गावपण शिल्लक होतं. स्मार्ट सिटी असा काही प्रकार नव्हता. माणसं एकमेकांना ओळखायची, एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी व्हायची. त्यामुळे नाती निर्माण व्हायची. हे सगळं भ्रमरनं शिकवलं असं टकले यांनी सांगितले.
असे घडले चंदुलाल शाह ते भाऊ
ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी यावेळी भ्रमरच्या जडणघडणीचा आलेख मांडतांना अनेक वेगळे पैलू मांडून चंदुलाल शाह यांची ओळख करून दिली. यात भ्रमरने गेल्या 50 वर्षांत पाक्षिक ते सायंदैनिक अशी मोठी वाटचाल केली आहे. या काळात अनेक आव्हानांना तोंड देत ही वाटचाल केली आहे, त्यामुळे आज खरा आनंद सोहळा आहे. त्याचप्रमाणे हा सोहळा भ्रमरच्या सातत्याचा देखील आहे. कारण अखंडपणे मेहनत केल्यामुळेच हे यश मिळाले आहे. सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या हस्ते पाक्षिकाचे प्रकाशन होऊन भ्रमरची वाटचाल सुरु झाली. पुढे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी साप्ताहिकचे प्रकाशन केले आणि त्यानंतर 5 मे 1973 रोजी भ्रमर सायंदैनिक म्हणून सुरु झाले. नाशिकची मुळची तीन दैनिके गांवकरी, देशदूत आणि भ्रमर. त्यानंतर बाहेरून वृत्तपत्रे येऊ लागली. मात्र या स्पर्धेमध्ये भ्रमरने स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. पूर्वी भ्रमरचे कार्यालय हे गावाची चावडी होती. तिथे लोक एकत्र येत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असत. याला कारणही अजातशत्रू असलेले चंदुलाल शाह हे केंद्रस्थानी होते. यातूनच पुढे मोठा असा भ्रमर परिवार तयार झाला. ‘क्राईम स्टोरी’ ही भ्रमरची ओळख आहे. मात्र ही ओळख तयार करतांना त्यांची इंडीयन पिनल कोड सोबत गट्टी जमली. कायद्याची वेगवेगळी कलमे तोंड पाठ झाली. पोलीस विभागाशी असलेली मैत्री पाहता पोलीस दलाला नेहमीच भ्रमर आपला पेपर म्हणून वाटत आला आहे. त्यामुळे पोलीस दलातील अनेकजण भ्रमर परिवाराशी जोडले गेले आहेत. भ्रमरची वाटचाल सुरु होते ती चंदुलाल शाह पेठे हायस्कूलमध्ये शिकत असताना पत्र लेखक जितमलजी छाजेड यांच्या पासून. त्यावेळी ते छाजेड यांच्यासोबत दैनिक देशदूतमध्ये जात असत. पुढे त्यांनीही दैनिकांमधून पत्र लेखन सुरु केले. हळूहळू वेगवेळ्या दैनिकातून मोठे पत्रलेखन केल्यानंतर आपणच एक दैनिक काढावे या भावनेतून भ्रमरचा जन्म झाला. सुरुवातीला सायंदैनिक सुरु केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे मनुष्यबळ त्यांच्याकडे नव्हते. बातमी लिहिण्यापासून ती शोधुन त्याच्यावर संस्कार करणे, जाहिराती जमविणे ही सगळी कामे चंदुलाल स्वत: करत असत. ही सर्व कामे त्यांना मनापासून आवडत होती. किंबहुना हा त्यांचा छंद होता. जेव्हा छंद हाच तुमचा व्यवसाय बनतो तेव्हा आयुष्य सुंदर कविता बनते असेच चंदुलाल यांच्या बाबतीत झाले. आचार्य अत्रे यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल सुरु करून मेहनतीच्या जोरावर त्यांनी भ्रमर मोठा केला. ही वाटचाल करत असतांना त्यांचा अनेक संस्था, लोक यांच्याशी संपर्क आला. यातूनच त्यांना ‘भाऊ’ ही नवी ओळख मिळाली. पत्रकारिता करत असताना सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा करणे ही चंदुलाल यांची आणखीन एक वेगळी ओळख म्हणता येईल. नाशिकच्या रिमांड होमसाठी त्यांचे सुरु असलेले कार्य याची साक्ष देतो. या रिमांड होममध्ये आलेल्या मुलांचे फक्त संगोपन नाही तर त्यांचे भविष्य घडविण्याचे काम ते करत आहेत. या रिमांड होममधल्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून उच्च सरकारी नोकरी मिळवली आहे. कोणी पीएचडी केली तर कोणी पोलीस दलात रुजू झाले आहे. या ठिकाणी असलेल्या मुलींची जबाबदारी स्वीकारून त्यांचे शिक्षण, लग्न त्यांनी पार पाडले आहे.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
एमईटीच्या विश्वस्त डॉ. शेफाली भुजबळ, मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, अशोक आत्राम, विराज इस्टेटचे संचालक राजेंद्र शहा, विलास शहा, रामबंधूचे संचालक हेमंत राठी, संकलेचा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक विजय संकलेचा, ठक्कर डेव्हलपर्सचे संचालक जितूभाई ठक्कर, नरेंद्र ठक्कर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, नाशिक प्रांत निलेश श्रींगी, माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर ईगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, संजय बोराळकर, किरण डोळस, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा, ज्येष्ठ विधिज्ञ दौलतराव घुमरे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रतापराव सोनवणे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, मनपा नगररचना विभागाचे संजय अग्रवाल, जीएसटी ट्रायब्युनलचे अधिकारी सुमेरकुमार काले, सौ. सुवर्णा काले, हर्षित पहाडे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे, देशदूतच्या निवासी संपादिका अॅड. वैशाली बालाजीवाले, नाशिक हेरॉल्डचे संचालक अमित बोरा, संपादक मिलिंद सजगुरे, आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले, लोकसत्ताचे ब्युरो चीफ अविनाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे, लोकनामाचे संपादक जयंत महाजन, अप्पर पोलीस अधीक्षिका माधुरी कांगणे, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ, बागड प्रॉपर्टीज् संचालक दीपक बागड, प्रजापती ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या नाशिक शाखेच्या प्रमुख वासंती दीदी, पुष्पा दीदी, लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीचे रिजनल मॅनेजर प्रकाश चित्तोडकर, निवेकचे अध्यक्ष संदीप गोयल, गुंज फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश बोरा, अमर कलंत्री, संजय अग्रवाल, तरुण गुप्ता, तुलसी आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर डी. के. झरेकर, कदम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, डॉ. एकनाथ कुलकर्णी, उत्तमराव आढाव, साहित्यिक प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे, प्रा. हरिष आडके, भाजपचे यशवंत नेरकर, बी.एस.एन. एल.सोसायटीचे चेअरमन भरत सावळे, मानवधन विद्यामंदिराचे संस्थापक डॉ. प्रकाश कोल्हे, जेऊघाले, साहित्यिक किरण सोनार, सावळीराम तिदमे, नंदकुमार दुसानिस, प्रकाश काळे, नंदू गायकर, अॅड. आदित्य वाणी, पेन्शन असोसिएशनचे सचिव आर. डी. सोनवणे, मनोज बोरसे, सुनील परदेशी, विजय राऊत, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त संजीव ठाकूर, विजय अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक राकेश चव्हाण, संचालक रवींद्र बागूल, गोविंद तुपे, संजय गुजराथी, रवी सोनवणे, अॅड. मनीष लोणारी, अॅड. दिपक पाटोदकर, लक्ष्मी असोसिएटस्चे संचालक राहुल जाधव व गिरीश नाईक, सावानाचे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, प्रदीप सराफ, सोपान थोरात, सुरेश राका, छबू नागरे, मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, सोनी गिफ्टचे संचालक नितीन मुलतानी, गिरीश मोहिते, संपत धोंगडे, माधवी देवळालकर, अशोक व्यवहारे, मोहिनीराज कुलकर्णी, श्रीकांत खांदवे, पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, सतीश पवार, माजी आमदार नितीन भोसले, युवराज भोसले, चंद्रकांत शौचे, काँग्रेसचे युवा नेते ज्ञानेश्वर गायकवाड, भाजपचे बाळासाहेब घुगे, प्रदीप कुचेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ. अनिता भामरे, महेश भामरे, व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर, राहुल बोराडे, देवराम सैंदाणे, साई अॅडव्हर्टायझिंगचे संचालक सुभाष गांधी, जगन्नाथ गायकवाड, करण शिंदे, दत्ता देवळालकर, अॅड. राहुल वाणी, माजी महापौर अशोक दिवे, प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, प्रमोद केदारे, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, एन. डी. केदारे, संदेश जाधव, वेध न्यूजचे संचालक संतोष कमोद, योगेश कमोद, संदीप पवार, राकेश गांगुर्डे, शिवाजी मानकर, डॉ. संजय जैन, चेतन पटणी, प्रशांत जुन्नरे, नाशिक जिल्हा केटरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल जोशी, संजय राकेचा, माणिक जायभावे, सगुणा फाऊंडेशनचे राजेश गांगुर्डे, जि. म. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे भिवानंद काळे, माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, पिंगळे पब्लिसिटीचे संचालक मोतीराम पिंगळे, किशोर घाटे, सावानाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, बाळासाहेब भोसले, चिन्मय गाढे, राजेंद्र बागूल, प्रा. किशोर पवार, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, रेणुकानगर पतसंस्थेचे युवराज गांगुर्डे, अजय सोनवणे, आवेश शेख, महिला बँकेचे नंदू गायकर, प्रशांत भावसार, माजी महापौर रंजना भानसी, अॅड. राजगुरु, कांतीलाल जैन, श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष भगवंत पाठक, माजी नगरसेवक अरुण पवार, संजय कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ, भागवत उदावंत, अश्विनी पांडे, देवयानी सोनार, भगवंत साबळे, माजी नगरसेवक अॅड. शाम बडोदे, प्रदीप जगताप, अॅड. मनीष आहेर, पत्रकार संजय पाठक, छायाचित्रकार राजू ठाकरे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, चेतन पणेर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी सुनील ढगे, अजित कुलकर्णी, सचिन पेखळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, मनोज उन्हवणे, माजी नगरसेविका कल्पना पांडे, समाधान जगताप, कोंडाजी चिवडाचे संचालक सुरेंद्र वावरे, बाळासाहेब लोंढे, पत्रकार सिद्धार्थ लोखंडे, प्रांजल कुलकर्णी, मनोज मुंदडा, वैष्णवी मुंदडा, अॅड. मंदार भानोसे, माजी नगरसेविका वैशाली भोसले, चैताली शिंदे, शेखर शिंदे, प्रा. गिरीश पाटील, ज्ञानेश देशपांडे, अॅड. डॉ. सुधीर कोतवाल, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, अनिल चौघुले, पत्रकार संदीप ब्रह्मेचा, नीलेश अमृतकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष किशोर गरड, भाजपचे नंदु देसाई, पत्रकार दीपक कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, दत्ता पाटील, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, पत्रकार सुनील ओसवाल, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामसिंग बावरी, आयमाचे पदाधिकारी धनंजय बेळे, बाळासाहेब कुंदे (निफाड), संजय गोसावी, ब्राह्मण महासंघाचे रामभाऊ कुलकर्णी, प्रा. सुभाष गायकवाड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पंकज चांडोले, अॅड. नंदकिशोर भुतडा, पत्रकार आसिफ सय्यद, संतोष नागरे, सुनील भडांंगे, प्रशांत भोर, समर्थ बँकेचे अभय कुलकर्णी, दीपक लांडगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, पत्रकार योगेश गांगुर्डे, प्रा. जयंत मुळे, तुळशीराम भागवत, माजी नगरसेविका शीला भागवत, प्रकाश कडलग, सी. ए. लोकेश पारख, संजय चव्हाण, नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. वैभव शेटे, सचिव अॅड. हेमंत गायकवाड, सहसचिव अॅड. संजय गिते, खजिनदार अॅड. कमलेश पाळेकर, सहसचिव अॅड. सोनल गायकर, सदस्य अॅड. प्रतिक शिंदे, अॅड. वैभव घुमरे, अॅड. शिवाजी शेळके, अॅड. पांडुरंग तिदमे, अॅड. शाम ढिकले, हॉटेल वैदेहीचे संचालक हेतल पटेल व रविशेठ, प्रमोदकुमार सिंग, अॅड. महेंद्र जानोरकर, अॅड. महेश पाटील, ललित नॉव्हेल्टीज्चे संचालक विनोद अंबाडकर, कविता अंबाडकर, अंबिका वुडन इन्डस्ट्रीजचे संचालक सतिश पटेल, अनिता पटेल, दीप्ती अंबाडकर, प्रणाली अंबाडकर, अॅड. वैशाल नाईक, सहदुय्यम निबंधक दीपराज लोखंडे, शंकर वलेचा, गणपत राजापूरकर, कुंदन, अजित गुप्ता, विशाल जातेगावकर, राहुल शाह, समाधान अनवट, रोहित अनवट, प्रिती मुसळे, जिग्नेश पटेल, श्री समर्थ इंडस्ट्रिजचे संचालक अजय शेटे, रोहन टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक राजेंद्र केदार, रंजना केदार, विश्वास बँकेचे सुरेश वाघ, वसंत ठाकरे, सुमनताई बागले, माजी नगरसेवक शाहू खैरे, मोहनलाल कुमट, पत्रकार हरिभाऊ सोनवणे, व्यावसायिक वामनराव लोखंडे, पत्रकार रवींद्र केडिया, नरेंद्र जोशी, दिनेश सोनवणे, अनिरुद्ध जोशी, मोहन कानकाटे, माजी खासदार प्रतापराव वाघ, सतीश जगताप, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. आष्टेकर, डॉ. कदम, रतन काळे, ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत, महेंद्र गायकवाड, अविनाश आहेर, सुरेश पवार, वाय. एस. गायकवाड, पी. ए. पाटील, नरेंद्र कुलकर्णी, अॅड. आर. आर. सुराणा, राहुल शहा, आनंद अकौन्टन्सी क्लासेससे संचालक आनंद बोरा, दर्शन घुगे, पुष्कर वैशंपायन, संजय उगांवकर, अजिंक्य नायगावकर, पत्रकार पद्माकर देशपांडे, नारायण काकड, सोमनाथ चौधरी, डॉ. प्रदीप गोंधळे, साहित्यिक अॅड. मिलिंद चिंधडे, सौ. मुक्ता चिंधडे, प्रकाश मुनशेट्टीवार, उदय जोशी, कृष्णराव बागूल, डॉ. शरद महाले, सौ. प्रतिभा महाले, वैश्य डिस्ट्रिब्युटर्सचे संचालक मितेश वैश्य, अमोल ट्रेडर्सचे संचालक अमोल अमळनेरकर, कृष्णा प्लेवर्ल्डचे संचालक राजेश उभराणी, सॅन कॉम्प्युटेकचे संचालक संजय चावला, अॅड. परिक्षित पटवर्धन, अॅड. अजय निकम, निलेश पाटील, नितीन सोमाणी, राजन भालेराव, निखिल टिपरी, मुकुंद गायधनी, विनोद अंबाडकर, मंदार दीक्षित, मिलिंद कुलकर्णी, संजय मुजुमदार, महिला बँकेचे सोनगिरे, महिला बँकेच्या संचालिका मधुबाला भोरे, सौ. स्नेहल सारंग, देवेंद्र सारंग, जनार्दन माळी, उपनिबंधक संजय गिते, प्रा. प्रकाश खळे, पत्रकार हेमंत जोशी, अरुण टोके, वसंत खैरनार, राजेंद्र केदार, सौ. रंजना केदार, सुनील केदार, हिरामण वाघ, भंडारी, अतुल पाटील, शिवराज आयुवन, सुनील पवार, अशोक तिवारी, प्रदीप कुलकर्णी, महेंद्र हेगडमल, अशोक कुर्हे, जनार्दन बेलगावकर, सचिन निरंतर, अनिल नहार, चंद्रशेेखर शहा, वैश्य डिस्ट्रिब्युटर्सचे संचालक सुरेश वैश्य, दीपक भावसार, कर सल्लागार शैलेश शाह, सुरेश मंत्री, महेंद्र पटेल, प्रदीप कापसे, किरण सपकाळ, अॅड. भानुदास शौचे, अॅड. अजित छल्लानी, के. के. जेऊघाले, आपलीच सेवाचे संचालक मंदार तगारे, विश्वनाथ जाधव, समीर भडांगे, रामेश्वर साबळे, जी. एम. चौधरी, चेतना सेवक, अॅड. सचिन धारराव, अॅड. सोनल गायकर, अॅड. संदीप गायकर, अॅड. शेषराव पवार, अॅड. राजेश ढोले, अॅड. सतीश येवले, यशवंत क्लासेसचे संचालक भालचंद्र पाटील, मुरलीधर पाटील, व्हीं. एम. ऑटोचे संचालक मनीष रावल, मनोहर जगताप, सौ. मीनाक्षी जगताप, शुभांगी बेलगांवकर, मंगला नेहे, भाऊसाहेब काळे, आप्पा हिंगमिरे, अरुण विसपुते, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, पां. भा. करंजकर, पत्रकार संदीप जाधव, भूषण कासार, प्रा. भागीनाथ घोटेकर, करण गायकर, दिनकर कांडेकर, मनीषा अॅडव्हर्टायझिंगचे संचालक अनिल अग्निहोत्री, पत्रकार दिगंबर शहाणे, मायकल खरात, जितेंद्र नरवडे, ज्ञानेश्वर भोसले, भाजपचे चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे, धनंजय पुजारी, रामाचार्य वाघमारे, विनोद नागपुरे, मनोज कोळपकर, पत्रकार सुशांत किरवे, डॉ. नारायण देवगावकर, मगनलाल बागमार, विजय खारे, सुधाकर गायधनी, मंगला काकड, दशपुत्रे, भाईजान बाटलीवाला, आवेश शेख, मुरलीधर कोल्हे, सचिन शहा, मनोज कोल्हे, इंदूबाई नागरे, चंद्रकांत पारख, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार प्रमोद पुराणिक, वैभव शहा, सिद्धांत कांबळे, सुशील काळे, सौ. राठी, सुराणा पब्लिसिटीचे संचालक गौतम सुराणा, अॅड. एस. यू. सय्यद, दीपक टिल्लू, दीपक येवले, चंद्रकांत वाघोलीकर, पत्रकार करणसिंग बावरी, सचिन आव्हाड, संजय महाले, गणेश कर्पे, संदीप धात्रक, सुनील पांडे, अशोक चोरडिया, राजेंद्र बेलेकर, प्रिया मुंडावरे, गोपाळ बर्वे, पत्रकार प्रकाश उखाडे, आर. आर. पाटील, पत्रकार अमोल सोनवणे, मीडिया अॅडव्हर्टायझिंगचे संचालक साहिल न्याहारकर, बापू गोर्हे, छायाचित्रकार जगदीश सोनवणे, विद्या जोग, पत्रकार भारत पगारे, धनंजय बोडके, कुंदन राजपूत, नितीन जांगडा, निर्मल गुजराणी, पराग आचलिया, ललित नहार, मुकेश मुनोत, अनंत मालपाणी, आशिष साखला, नीलेश बंब, सौ. वर्षा देशपांडे, सौ. अनुजा देसाई, चेतन बंब, अनिकेत पाठक, आकाश पाटील, पारख अप्लायन्सेसचे संचालक रवींद्र पारख, हितेश जैन, उत्तममामा तांबे, रतन काळे, सुभाष तळाजिया, सुनील परदेशी, डॉ. सुधीर कुलकर्णी, जनलक्ष्मी बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, पुष्पर वैशंपायन, रवींद्र दोंदे, सौ. दोंदे, निशिकांत पगारे, अमर मुंदडा, पत्रकार गुलाब मणियार, आनंद मेळाचे संचालक मनुभाई, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत बनकर, डॉ. पराग पटणी, डॉ. काजल पटणी, बिझनेस बँकेचे संचालक अशोक तापडिया, उद्योजक आशिष नहार, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक नारायणराव वाजे, प्रा.डॉ. वृंदा भार्गवे, सौ. ललिता भार्गवे, मयूर पेन्टस्चे संचालक मयूर शाह, शितल शाह, तृप्ती पारेख, रोहित शाह, राधिका धोंगडे, वैशाली साळी, सुषमा पारेख, अॅड. नेहा पारेख, सोनल शाह, संगीता बेणी, चाणक्य अॅकडेमीचे संचालक अण्णासाहेब नरूटे, किशोर चांदवडकर, योगेश आसावा, अशोक काका व्यवहारे, पद्मा पटणी, वैशाली साखरे, ओम साखरे, चेतन बागमार, अॅड. भानुदास शौचे, अॅड. जयप्रकाश दाधिच, रेणुका नगर पतसंस्थेचे अध्यक्ष नईम मामू शेख, संचालिका नीलिमाताई सोनवणे, प्रिता मुंडावरे, श्रीधर सोनवणे, सौ. सोनवणे, भाजपच्या रोहिणी नायडू, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भामरे, प्रा. हरिष आडके, प्रशांत देसले, गौरव मुनोत, सर्कल प्रेसचे संचालक अमित ओक, गोविंद चौधरी, बांधकाम व्यावसायिक विजय कांबळे, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, जयकुमार विसपुते, भिकन चव्हाण, बाळकृष्ण कुलकर्णी, समर्थ बँकेचे उपाध्यक्ष मनोज गोडसे, संचालक बाळकृष्ण कुलकर्णी, साहित्यिक बी.जी.वाघ, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहराजेंद्र निकम, विजय शाह, राजेंद्र शाह, सौ. कुलकर्णी, सादीक पठाण, तलवारबाजी संघटनेचे अशोक दुधारे, राजू शिंदे, आनंद खरे, नाशिक बॉडीबिल्डींगचे राजेंद्र सातपूरकर, हेमंत साळवे, ज्युदोचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, ईश्वरी शिंदे, सुहास मैंद, नाशिक खो-खो संघटनेचे मंदार देशमुख, उमेश आटवणे, महेश सावकार, महेश मलवी, मंगेश शिरसाठ, जगदीश सोनवणे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह, सौ. प्रतिभा शाह, अॅड. चैतन्य शाह, हितेश शाह, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, नाशिक अॅॅडर्व्हटायझिंगचे संचालक प्रमोद भार्गवे, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर. सी. शाह, महिला बँकेच्या चेअरमन डॉ. शशिताई अहिरे, माजी नगरसेवक गुरूमित बग्गा, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, धनपत अग्रवाल, श्रीकांत बेणी, अॅड. लिना शेख, सायक्लॉन डॉन अॅकडेमीचे संचालक जतींदर चिक्की, रमेश वणकर, डॉ. कैलास कमोद, सावळीराम तिदमे, श्रेणीकुमार शाह, सौ. ज्योती शाह, भरतकुमार शाह, सौ. सारिका शाह, पराग शाह, सौ. माया शाह, सौ. नयना शाह, अमृता शाह, नेहा शाह, आदित्य शाह, दीपेन शाह, अशोक भिरूड, मनोज शाह, पियूष पारेख, उर्विश पारेख, विजय काकड, कुणाल देशमुख, डी.आर. पाटील, अमोल जोशी, अरुण मुनशेट्टीवार, रमेश कडलग, शशांक हिरे, सुनील रूणवाल, सौ. पद्मा रुणवाल, नईम मामू शेख, मोनीष पारेख, प्रतिक शुक्ल, अविनाश आहेर, नंदा पवार, ज्योती शौचे, नेहा पवार, सुखदा शौचे, अमृता शौचे, अर्चना आहेर, दिनेश पाटील, प्रदीप भोर, सौ. शैलजा बैरागी, भाऊसाहेब काळे, शशिकांत सातपुते, अशोक गायकवाड, अरुण देशपांडे, प्रशांत निरंतर, किशोर देशपांडे, हेमंत आंबेकर, राजन जोशी, चंद्रकांत बर्वे, रामदास नागवंशी, नरेंद्र खैरनार, सौ. सुरेखा खैरनार, पी. एम. कोशी, मनोज जोशी, आय. वाय. शेख, सौ. स्नेहल सारंग, राजू अनमोला, शेखर देसाई, रवींद्र करमासे, दीपक सोनवणे, विनोद नगरदेवळेकर, दत्तात्रय खोलमकर, प्रदीप वाघमारे, संजय मोरे, रंगनाथ चतूर, सोमनाथ पवार, बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मीकांत जगताप, कमलेश शिंदे, सुमंत माळी, प्रेम तपासे, पारस ट्रेडर्सचे संचालक अजय मंचरकर, सी. ए. योगेश बाफणा, आशिष बेदमुथा, अनिकेत पाठक, आकाश पाटील, सी. ए. चेतन बंब, आनंद साखला, अनंत मालपाणी, जितेश जोशी, संदीप जगताप, विश्वास मदाणे, भूषण काळे, शोभा जगळे, जयश्री दोन्दे, सोनाली तायड़े, स्वाती यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सीमा पेठकर यांनी केले. आभार हितेश शाह यांनी मानले.
…आणि ओठी आले हसू
* भुजबळ यांनी भाषणात रंगत आणताना सुरुवातीला लहानपणी भ्रमर कसा विक्रीसाठी येत होता हे सांगताना थेट पेपरवाल्याची मिमिक्री करून दाखवली. ए …….भ्रमर…. असे ओरडत तो येत असे अशी आठवण त्यांनी सांगितली.
* चंदुलाल यांनी दहावीत असताना दैनिकात लिहायला सुरुवात केली. येथे आपण राजकारणी झालो तरी लिहिता येत नाही. बोलायला कितीही सांगा; पण लिहिताना गडबड होते अशी मिश्कील कबुली भुजबळ यांनी दिली, तर आम्ही वाचक असल्यामुळेच वर्तमानपत्रे वाचली जातात असे सांगत हशा पिकविला.
* भ्रमरच्या रौप्यमहोत्सवाचा समारोप कार्यक्रम माझ्याच उपस्थितीत झाल्याची आठवण भुजबळ यांनी करून दिली. त्यानंतर सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभाच्या कार्यक्रमालाही मी आलो आहे. आता शाह यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे आमंत्रणही आताच द्या, मी येणार आहे, असे सांगत भुजबळ यांनी भ्रमरचे कौतुक केले.