भाविकांसाठी खुशखबर! आजपासून शेगावातील ‘आनंद सागर’मधील अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं..

राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांनाकडून भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यात आलेले ‘आनंद सागर’ हे मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे.

राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांनाकडून 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती.

अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे.

हे अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं करण्यात येत आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी इतरही काही सोयी सुविधा याठीकणी सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.

आनंद सागर सुरू झाल्यानंतर त्याची भव्यता दिव्यता बघून या ठिकाणी देशभरातील लाखो भाविक, पर्यटक दररोज आनंद सागरची अध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी येऊ लागले. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच गेली, खरंतर हा पडीक जमिनीचा भाग शेगाव शहरालगतचा होता. त्यामुळे संस्थांनी सरकारकडून ही जागा लिझवर घेऊन विकसित करून अतिशय भव्य असं आनंद सागर त्या जमिनीवर उभारलं होतं. मात्र काही कारणानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय संस्थानानं घेतला होता.

यातील प्रसिद्ध अशी मिनी ट्रेन, चिल्ड्रन पार्क, एम्युजमेंट पार्क हे सर्व काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता आनंद सागरमधील फक्त अध्यात्मिक केंद्र आहे त्यास्थितीत आजपासून सुरू झालं आहे.

फक्त त्यातील मंदिरं आणि इतर सुविधा यांचाच लाभ आता भक्तांना मिळणार आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून बंद असलेलं आनंद सागर याची आता दुरुस्ती आणि डागडुजी करून रंगरंगोटी सुरू आहे. आता फक्त अध्यात्मिक केंद्रात जाऊन फक्त मंदिरांमध्ये दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, आजपासून बंद पडलेलं आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र सुरू होणार असल्यानं या ठिकाणी भक्तांची आणि आध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांची रेलचेल असणार आहे.

आनंद सागर येथील शांतता स्वच्छता सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता येत्या काळात टप्प्या टप्प्यानं आनंद सागर सुरू झाल्यानंतर शेगावात पर्यटक आणि अध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे. हे अध्यात्मिक केंद्र आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत निःशुल्क सुरू होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!