नाशिक :- येथे एक मोबाईल शॉपी व किराणा दुकान अज्ञात चोरट्याने फोडून सुमारे 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वणीत जितेंद्र दुसाने यांच्या मालकीचे महालक्ष्मी इलेक्ट्रिक व मोबाईल शॉपी व सुमित बोरा यांच्या मालकीचे किराणा दुकान आहे. 29 जुलै रात्री 11 वाजेनंतर व 30 जुलैच्या सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मोबाईल शॉपीच्या छताचे इंटेरिअर तोडून व छता खालील भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. या दुकानात विक्रीस असलेले मोबाईल, ब्लुटूथ, बॅटरी, पॉवर बँक, टॅब, स्मार्ट वॉच, रेपरिंग साठी आलेले मोबाईल असा एकूण 62,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

तसेच बोरा यांच्या किराणा दुकानातून 14,500 रुपयांचा किराणा माल व मंदिरातील सुमारे 7000 रुपये रोख, 1 शोची बंदूक, कामगाराचा 3000 रुपये किमतीचा मोबाईल व 2000 रुपये रोख असा एकूण 89 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.
दुसाने यांच्या फिर्यादीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.