राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.

त्यांना कोरोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येऊन तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगाने वाहू लागलेत.

आज एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे आता काय करतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!