नाशिक :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. यादौऱ्या दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसरे उपस्थित होते.
यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.