सर्वसामान्यांना महागाईचा झटका; आता “या” वस्तूंवरही लागणार जीएसटी

मुंबई :– जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या त्रासातून सर्वसामान्य नागरिक होरपळून जात असताना त्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर असलेली कर सवलत पुन्हा मागे घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत काही वस्तूंवरील जीएसटी दरात वाढ केली आहे. ही नवीन करवाढ 18 जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.

सीतारामण यांनी सांगितले की, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोडा शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंतत्रीगटाकडे पाठवण्यात आला आहे. गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वस्तूंवर लागणार जीएसटी
पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता 5 टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्याशिवाय, टेट्रा पॅक आणि बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

बजेट हॉटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरावरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत हॉटेलच्या प्रतिदिवस 1000 रुपये भाडे दर असणाऱ्या रुमसाठी जीएसटी लागू करण्यात आले नव्हते. आता, या खोल्यांसाठी 12 टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय, रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!